Friday, September 10, 2010

बाप एक निमित्त असतो;
आपल्या जन्मासाठी;
तर आई एक माध्यम असतं;
परमेश्वराच्या गोड स्वप्नातून जन्मलेलं.

आईच्या श्वासावर तरतो आपण;
आईच्या घासावर जगतो आपण;
एवढं सगळं होउनसुद्धा;
बापावरच्या अन्यायबद्दल बोलतो आपण.

आयुष्यभर बापाच्या नावाची;
पाटी आपण लावतो;
पण कधिही चटका बसल्यावर;
आईचीच आठवण काढतो.

आपल्या सगळ्या संकटांच उत्तरं;
आईजवळ तात्काळ असतं;
बाप बजावतो कर्तव्य फक्त;
त्याला बाकी काही देणं नसतं.

तसं बघितलं तर आई;
आपल्या गाविही कधी नसते;
पण बापापेक्ष्या आईच तुमच्यासाठी;
श्वासास्वासागणिक झुरते.

तुमच्या प्रत्येक दुखाःसाठी;
आईच्या डोळ्यात अश्रू असतो;
बाप मात्र समाजाच्या भीतिने;
आयुष्यभर कोरडच राहतो.

बाप कधी चांगला असतो;
नियमाला अपवाद असल्यासारखा;
पण आयुष्य नियमांनी जगायचं असतं;
अन अपवाद फक्त अभ्यासायचे असतात.

Read more: http://memarathi.blogspot.com/2010/05/blog-post_10.html#ixzz0z7K3myiM

No comments:

Post a Comment